[Marathi] मुंबई, रत्नागिरी येथील कमाल तापमानात वाढ, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची संभावना

February 20, 2018 3:22 PM | Skymet Weather Team

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हवामान पूर्णतः  कोरडे आहे. पावसाच्या अनु-उपस्थितीमुळे आकाश निरभ्र असून स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, ज्यामुळे तापमानात  उल्लेखनीय  वाढ झाली. मागील संपूर्ण  महिन्यात कोंकण आणि गोव्यामध्ये  वातावरण कोरडे असून, उष्णता  वाढत आहे.  संपुर्ण  विभागात , विशेषतः  दक्षिण  आणि  उत्तर भागात  तापमानात  चांगलीच वाढ  झाली.  रात्रीच्या  वेळी  सुद्धा कोकणात आता  गर्मी जाणवत असून, किमान  आता  २०-२५ अंश च्या दरम्यान आहे.

मागच्या  २४ तासांत, मुंबई आणि हर्णे  येथील कमाल तापमान  अनुक्रमे  ३४.१ °C  आणि  ३१.४°C  इतके नोंदले गेले जे सरासरीच्या तुलनेत ४ अंशाने  जास्त होते.  रत्नागिरी आणि  डहाणू  येथे  दिवसाचे  कमाल तापमान  सरासरीच्या तुलनेत  २ °C  जास्त असून, अनुक्रमे ३२.५ °C  आणि  २९.८ °C  इतके नोंदले गेले.

सध्या दक्षिण महाराष्ट्र  ते केरळ दरम्यान, अशक्त  प्रणाली असून  ज्यामुळे पावसाची  कोणतीही शक्यता  नाही. सद्यस्थितीत  महाराष्ट्र आणि परिसरावर पाऊस  घेऊन  येणारी प्रणाली तयार होत नसल्यामुळे वातावरण  शुष्क राहील. कोरड्या  वातावरणामुळे तापमानात वाढ होईल.  ज्यामुळे दमट आणि उष्ण वाऱ्यांपासून  ह्या भागाची सुटका नाही.

[yuzo_related]

शेतीसाठी शिफारस

वाढणाऱ्या  तापमानामुळे,  रसशोषक  किडी आणि  हंगामी कीड, फुलांवर आणि फळावर  असलेल्या  आंबा,  काजू आणि भाजीपाला पिकांवर पडण्याची शक्यता  आहे.  त्यामुळे कोंकण   शेतकरी बांधवानी आंबा, काजू , केळी, सुपारी आणि नारळाच्या फळबागेची  काळजी घेऊन, गरज पडल्यास फवारणी करावी. फुलगळ आणि फळगळ थांबवण्यासाठी पिकास  सिंचित करावे.

Image Credit: traveltriangle          

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES