[Marathi] मुंबई, ठाणे येथे कोरडे हवामान, फळबागांना सिंचन करावे

February 21, 2018 3:10 PM | Skymet Weather Team

सततच्या  कोरड्या आणि शुष्क हवामानामुळे कोंकण आणि गोव्याच्या तापमानात लक्षणीय झाली आहे. दिवसाचे कमाल तापमान दक्षिण कोंकण आणि गोव्यात  सरासरीच्या तुलनेत २-३ °C जास्त होते, तर उत्तर भागात तापमान सरासरीपेक्षा ४°C ने जास्त होते.

खरे तर कोंकण आणि गोवा भागात हवामान उष्ण ते अतिउष्ण असून  तापमान ३५°C पेक्षा जास्त नोंदले जात आहे. काल मुंबईत दिवसाचे कमाल तापमान ३२.७°C इतके नोंदले गेले ; जे सरासरीच्या तुलनेत २°C ने जास्त होते.मुंबईप्रमाणेच , ठाणे येथे देखील २० फेब्रुवारीचे तापमान तब्बल ३६.६°C इतके नोंदले  गेले, तर हर्णे  आणि डहाणू  येथे दिवसाचे  कमाल तापमान  सरासरीच्या  २°C वर होते.

सध्याच्या  गरम हवामान हे सततच्या कोरडे  आणि उष्ण वाऱ्यामुळे  आहे. स्काय  मेट वेदर च्या अंदाजानुसार  कोंकण आणि गोव्यात  येत्या काही दिवसात  पावसाची शक्यता नाही. कोंकणात  आकाश मोकळे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश  राहील. पुढील ४८ तासांत  तापमानात किंचित वाढ  होण्याची  शक्यता  आहे. सायंकाळी  मात्र  वारे सुटून हवामान  आह्लादायक  राहील.

[yuzo_related]

शेतीसाठी शिफारस

वाढणाऱ्या  तापमानामुळे,  रसशोषक  किडी आणि  हंगामी कीड, फुलांवर आणि फळावर  असलेल्या  आंबा,  काजू आणि भाजीपाला पिकांवर पडण्याची शक्यता  आहे.  त्यामुळे कोंकणातील शेतकरी बांधवानी आंबा, काजू , केळी, सुपारी आणि नारळाच्या फळबागेची  काळजी घेऊन, गरज पडल्यास फवारणी करावी. फुलगळ आणि फळगळ थांबवण्यासाठी पिकास  सिंचित करावे.तसेच, उन्हाळी  भुईमूग  आणि भाताच्या पिकास गरजेनुसार पाणी दयावे.

Image Credit: Oyorooms         

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES