मागील संपूर्ण महिन्यामध्ये मध्य महाराष्ट्रात हवामान पूर्णतः कोरडे राहिले आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र फेब्रुवारी च्या मध्यात दि. ११-१४ च्या दरम्यान वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला होता.
[yuzo_related]
कोरड्या हवामानामुळे, कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. बुधवाराचे सातारा येथे कमाल तापमान ३५.५ °C नोंदले गेले जे सरासरीच्या तुलनेत ३°C ने जास्त होते. त्याप्रमाणेच सोलापूर येथे कमाल तापमान ३७.५°C, आणि सांगली ३६. ३°C नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा अनुक्रमे १ आणि २ °C ने जास्त होते.
जर किमान तापमानावर नजर टाकल्यास, नाशिक येथे किमान तापमान १६.२°C आणि पुणे येथे १४.९°C नोंदले गेले जे सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे तीन आणि दोन अंशाने जास्त होते.
स्काय मेट च्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या परिसरावर पाऊस देणारी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही, ज्यामुळे मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.
त्यानंतर, राजस्थान आणि गुजरात वर ६ ते ७ मार्च च्या दरम्यान एक चक्रवात तयार होण्याची शक्यता आहे. हवामानाच्या ह्या स्थिती मुळे अरबी समुद्रावरून उष्ण आणि दमट वारे मध्य महाराष्ट्रावर वाहतील. त्यामुळे, या भागातील रात्रीचे तापमान वाढून, रात्री जास्त उष्ण राहतील. तसेच कमाल तापमानात वाढ होणार नाही. हवामान उष्ण आणि कोरडे राहील.
शेतीसाठी शिफारस
उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे शेतकरी बांधवानी गहू आणि उशिरा लागवड केलेल्या हरभरा पिकाची कापणी पूर्ण करावी. तसेच पक्व होण्याच्या स्थितीतले द्राक्ष आणि डाळिंब फळांची काढणी करावी. शेतकरी बांधवानी उन्हाळी भुईमूग आणि भाजीपाला पिकास सिंचित करावे.
Image Credit: tripadvisor
Any information taken from here should be credited to skymetweather.com