[Marathi] पुणे, नाशिक, सातारा, सांगली येथे दिवस - रात्रीच्या तापमानात तफावत,उन्हाळी भुईमूग आणि भाताची पेरणी करावी

February 14, 2018 5:36 PM | Skymet Weather Team

विदर्भ आणि मराठवाड्यात  मागील ४८ तासांत पाऊस आणि गारपिटीने  थैमान घातले,  पण सुदैवाने  कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात  मात्र हवामान कोरडे राहिले.

ठाणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे येथे वातावरण  शुष्क  राहिले. अंशतः  ढगाळ ते पूर्ण ढगाळ वातावरण राहिल्यामुळे  कमाल तापमानात मात्र घट  झाल्याचे निदर्शनास  आले.

[yuzo_related]

मागील २४ तासांमधे  मध्य महाराष्ट्र आणि कोंकण भागात कमाल तापमानात  वाढ झाल्याची  नोंद झाली. निरभ्र आकाश आणि  स्वच्छ  सूर्यप्रकाश  यामुळे  तापमानात वाढ झाली. कमाल तापमानात जरी वाढ झालेली असली तरी गरमपणा  जाणवणार नाही.

स्काय मेट च्या हवामान अंदाजानुसार, उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात किमान  तापमानात घट  होईल रात्रीचे वातावरण थंड आणि आल्हाददायक राहील.  ईशान्य भागावरून येणाऱ्या थंड  वाऱ्यांमुळे  किमान तापमनात घट  होईल

Click the image above to see the live lightning and thunderstorm across Maharashtra

आजपासून पुढील ८-१० दिवसात  हवामानात फारसा बदल होण्याची संभावना नाही, हवामान पूर्णतः  कोरडे राहील.

वातावरणाचा शेतीवर होणारा परिणाम  आणि शेती  कामांसाठी  शिफारस

मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना असे आवाहन करण्यात येते कि  त्यांनी  तयार रब्बी  पिके  : गहू, ज्वारी  आणि हरभरा ह्याची कापणी  पूर्ण करावी.

कोंकणातील शेतकरी बांधवानी उन्हाळी पिकांची ( भुईमूग , भात) पेरणी पूर्ण करावी व  गरजेनुसार पाणी दयावे. मागील काही दिवसात ढगाळ हवामानामुळे आंबा, काजू, डाळिंब  आणि द्राक्षं  बागांमध्ये  रोग आणि कीड पडण्याच्या  शक्यतेमुळे शेतकरी बांधवानी दक्ष  राहावे. गरज पडल्यास  रोग  नियंत्रणासाठी  फवारणी करावी.

Image Credit:

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES