[Marathi] नाशिक, पुणे येथे कोरडे हवामान, उन्हाळी पिकास सिंचित करावे

February 16, 2018 7:08 PM | Skymet Weather Team

नुकत्याच झालेल्या पावसापासून कोंकण आणि गोव्याप्रमाणेच मध्य महाराष्ट्राचा भाग सुद्धा कोरडा  राहिला.

कोरड्या आणि उबदार वातावरणामुळे मध्य महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास किंवा सरासरीच्या तुलनेत  किंचित कमी आहे, तर किमान तापमान  मात्र सरासरीच्या तुलनेत किंचित जास्त आहेत.  उत्तर भागाच्या तुलनेत  दक्षिण मध्य महाराष्टात   गरमी  जास्त असून, कमाल तापमान  ३० अंशच्या  जवळपास नोंदले जात आहे.

मागील २४ तासांत, कोल्हापूर येथील कमाल तापमान  सरासरीच्या २ अंश कमी नोंदले गेले.  तर  सोलापूर, नाशिक, जळगाव आणि सांगली येथे  दिवसाचे उच्चतम तापमान सरासरीच्या तुलनेत १ अंश ने कमी होते. त्यासोबतच,पुणे  येथील कमाल तापमान सरासरीएवढे  होते.

[yuzo_related]

स्काय  मेट वेदर  च्या हवामान अंदाजानुसार,सद्यस्थितीत,  मध्य  महाराष्ट्रातील  हवामानात फारसा बदल संभवत नाही, पण तापमानात वाढ  होण्याची शक्यता आहे. साधारणतः  हवामान कोरडे राहून  निरभ्र  आणि स्वच्छ सूर्यप्रकाश राहिल.पूर्वेकडून येणाऱ्या जमिनी  वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे, जेणेकरून  कोरडे आणि गरम हवामान  राहील.

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

शेतीची करावयाची कामे

ढगाळ वातावारण आणि वाढलेले  तापमान  ह्यामुळे आंबा, द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला  पिकात रोगाचा प्रादुर्भाव  होण्याची शक्यता आहे ज्यामुळे शेतकरी  बांधवानी  दक्ष  राहावे.  उन्हाळी  पिकास गरजेनुसार पाणी द्यावे.  कापणीस  तयार असलेली  गव्हाची, ज्वारीची  आणि हरभऱ्याची  पिके कापून  सुरक्षित  ठिकाणी ठेवावीत.

Image Credit: accuweather           

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES