मराठवाड्यात दि. १३ फेब्रुवारी नंतर हवामान प्रामुख्याने कोरडेच राहिले आहे. ज्यामुळे दिवस आणि रात्रीचे तापमान मराठवाड्याच्या सर्वच भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंश सेल्सिअस ने जास्त होते. जसे कि , परभणी येथील कमाल तापमान ३७.५°C, जे सरासरीच्या पेक्षा ३ अंशाने जास्त होते. त्याप्रमाणेच, नांदेड येथील कमाल तापमान ३७°C आणि औरंगाबाद ३५. ४°C होते, जे सरासरीपेक्षा २ अंशाने जास्त होते.
[yuzo_related]
जर किमान तापमानावर नजर टाकल्यास, औरंगाबाद येथील किमान तापमान १८.६°C आणि नांदेड १९°C नोंदले गेले; जे सामान्य तापमानापेक्षा अनुक्रमे ४ आणि २ अंशाने जास्त होते.
स्काय मेट च्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या परिसरावर पाऊस देणारी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही, ज्यामुळे मराठवाड्यात हवामान शुष्क राहील.या भागातील रात्री जास्त गरम राहतील.
त्यानंतर, मराठवाडा आणि विदर्भावर ६ मार्च च्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हवामानाच्या ह्या स्थिती ८ मार्च पर्यंत राहील, ज्यामुळे ह्या भागात हवामान ढगाळ राहील. अरबी समुद्रावरून येणाऱ्या दमट आणि उष्ण हवेमुळे रात्रीचे तापमान वाढेल, तर कमाल तापमानात घट होईल. मराठवाड्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता नाही. थोडक्यात, मराठवाड्यात हवामान उष्ण आणि कोरडे राहील.
शेतीची करावयाची कामे
उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे शेतकरी बांधवानी गहू आणि उशिरा लागवड केलेल्या हरभरा पिकाची कापणी पूर्ण करावी. तसेच पक्व होण्याच्या स्थितीतले संत्रा, मोसंबी, द्राक्ष आणि डाळिंब फळांची काढणी करावी. शेतकरी बांधवानी पिके काढलेल्या जमिनीची दोनही बाजूनी खोल नांगरटी करून जमिनीस उन्हास तापू द्यावे.
Image Credit: soschildrensvillages.in
Any information taken from here should be credited to skymetweather.com