Skymet weather

[Marathi] संत्रा, मोसंबी फळांची काढणी करावी, नागपूर अमरावती मध्ये स्वच्छ हवामान

February 27, 2018 4:27 PM |

Nagpur 1

महाराष्ट्रात १२ ते  १५ फेब्रुवारीच्या  दरम्यान झालेल्या  दमदार  पावसानंतर, हवामान प्रामुख्याने  कोरडे  राहिले आहे.  हा  पाऊस  मुख्यतः विदर्भ  आणि मराठवाड्यापुरता मर्यादित  होता. त्यानंतर,हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहिले आहे.

सततच्या  शुष्क हवामानामुळे, तापमानात  वाढ  होत आहे. विदर्भाच्या  भागात  सुद्धा  कमाल तापमान हे सरासरीच्या वर नोंदले जात आहे. कमाल तापमानात तर लक्षणीय  वाढ होऊन, सरासरीपेक्षा ४-५ अंश जास्त, तर किमान तापमान सरासरीच्या २-३ अंश  वर नोंदले जात आहे. काल संपुर्ण विदर्भातील हवामान केंद्रावर कमाल तापमान सरासरी पेक्षा  जास्त होते,  बुलढाणा  येथील  तापमान  सरासरीपेक्षा  ४ अंशाने जास्त होते.  तर,  वर्धा, अकोला,यवतमाळ आणि अमरावती  येथे  कमाल  तापमान  सरासरीपेक्षा  ३ अंशाने  जास्त होते.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर च्या निरीक्षणानुसार, केरळ ते दक्षिण महाराष्ट्रापर्यंतच्या  पट्ट्यात कमी दाबाचा कमकुवत पट्टा तयार आहे, पण त्यामुळे  विदर्भातील हवामानात  फारसा  फरक संभवत नाही.  म्हणूनच  विदर्भातील हवामानात कोणताही बदल  होणार नसून हवामान उष्ण आणि कोरडे राहील.   येथून काही दिवस तापमानात फारशी वाढ  होणार नसली  तरी,  तापमान सरासरीपेक्षा जास्तच  राहील.

शेतीसाठी  शिफारस

उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे  शेतकरी बांधवानी  उन्हाळी  भुईमूग, भाजीपाला आणि कमी कालावधीची फळपिकांना  विशिष्ट कालावधीत  पाणी  द्यावे. गहू तसेच  उशिरा लागवड केलेल्या हरभरा पिकाची कापणी  करावी, तसेच  संत्रा, मोसंबी आणि  डाळिंब  फळांची काढणी करावी.

Image Credit: YouTube             

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try