पुणे, नाशिक ठाणे रत्नागिरी येथे दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ

February 26, 2018 6:30 PM | Skymet Weather Team

सद्यस्थतीत महाराष्ट्रात हवामान पूर्णतः कोरडे आहे. जर विभागवार हवामानाची स्थिती बघितल्यास,कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान पूर्णतः शुष्क राहील. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोंकण भागातील किमान वाढून सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंश सेल्सिअस ने जास्त आहे. तर दक्षिण महाराष्ट्र आणि कोंकणच्या जिल्यामध्ये किमान तापमान सरासरी एवढे किंवा किंचित कमी नोंदले जात आहे.

[yuzo_related]

मुंबईचे सोमवारचे किमान तापमान २०.६°C, पुणे येथे १४°C,नाशिक १६. ५°C आणि सातारा येथे १३. ५°C नोंदले गेले. केरळच्या किनार पट्टीपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यंत कमी दाबाच पट्टा आहे . पण त्यामुळे कोंकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तापमानात फारसा बदल संभवत नाही. स्काय मेट च्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ह्या भागावर हवामान उष्ण आणि कोरडे राहील.

वातावरणाचा शेतीवर होणारा परिणाम

कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवानी कोरड्या आणि उष्ण हवामानाचा फायदा घेऊन गहू आणि इतर रब्बी पिकांची कापणी आणि मळणी पूर्ण करावी. त्यासोबतच पक्व झालेल्या द्राक्ष, डाळिंब आणि पपई फळांची काढणी पूर्ण करावी. तसेच उन्हाळी भुईमूग आणि भाजीपाला पिकास आवशयकतेनुसार पाणी द्यावे.

Image Credit: enchantingtravels.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES