Skymet weather

[MARATHI] देशभरात मे महिन्यातील पहिल्याच आठवड्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस

May 8, 2015 5:32 PM |

rain in weekया वर्षी मार्च आणि एप्रिल हे दोन महिने भारतात तसे चांगले हवामान होते. या दोन महिन्यातच झालेल्या पावसाचा आढावा पुढीलप्रमाणे. स्कायमेट या हवामान संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात भारतात मासिक सरासरीपेक्षा ९८% जास्त पावसाची नोंद करण्यात आली, म्हणजेच या महिन्यातील सरासरी पाऊस ६१.१ मिमी झाला असून नेहमी मासिक सरासरी साधारण पणे ३०.९ मिमी असते. तसेच एप्रिल महिन्यातही झालेले दिसून आले या महिन्यात सरासरी  ६६.१ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी नेहमी ३८.५ मिमी असते.

३० एप्रिल ते ६ मे हा कालावधी मात्र याला अपवाद ठरलेला दिसून आला. या आठवड्यात मात्र संपूर्ण देश प्रचंड गरमी आणि असह्य उकाड्याचा सामना करताना दिसून आला आणि अगदीच कुठेतरी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. संपूर्ण देशात फक्त उत्तरपूर्व आणि दक्षिण भारतात काही ठिकाणी या कालावधीत तुरळक पाऊस झालेला दिसून आला म्हणूनच देशात या आठवड्यात सरासरी पावसापेक्षा २२% ची तुट झालेली आहे.

पश्चिम, मध्य व उत्तर भारतात तर या कालावधीत अजिबातच पाऊस झालेला नाही. तसेच सौराष्ट्र, गुजरात या पश्चिम भारतातील भागातही पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. तसेच राजस्थानातही पाऊस झालेला नसून येथे तर सरासरीच्या ९६% तूट दिसून आली.

देशभरातील ३० एप्रिल ते ६ मे या कालावधीतील पाऊस:

 उत्तर भारतातील पाऊस:

उत्तर भारतात पंजाबच्या काही भागात ०.६ मिमी पावसाची नोंद झाली असून हि नोंद मासिक सरासरीपेक्षा ८१% ने कमी आहे. तसेच हिमाचल प्रदेशात ८.२ मिमी पावसाची नोंद झाली असून येथेही ४०% ची तूट असल्याचे निदर्शनास आले.

 

उत्तरपूर्व भारतातील पाऊस:

या भागात हवामानात बरेच बदल व वातावरणात काही हालचाली होऊन देखील या भागात पावसाची मात्र कमतरताच दिसून आली. उदाहरणच बघायचे झाल्यास आसाम आणि मेघालय येथे या कालावधीत ५०.८ मिमी पावसाची नोंद झाली, पण तरीही तेथे पाऊस साप्ताहिक सरासरी ७५.१ मिमी मात्र गाठू शकलेला नाही. तसेच अरुणाचलप्रदेशातही तसेच झाले असून येथे ४०.९ मिमी पावसाची नोंद झालेली असून येथेही ३७% पावसात तूट दिसून आली.

पूर्व भारतातील पाऊस:

उत्तर प्रदेशाचा पूर्व व पश्चिम भाग आणि बिहार येथे सुद्धा पावसाचा अभाव दिसून आला. उत्तरप्रदेश आणि बहार येथे अनुक्रमे ९३% व ७४% पाऊस कमी झालेला आहे.

दक्षिण भारतातील पाऊस:

दक्षिणेतील कर्नाटकात दक्षिण भागात आणि रायलसीमा येथे चांगलाच पाऊस झालेला असून येथे मात्र सरासरीपेक्षा अनुक्रमे ४१% व २५% जास्त पावसाची नोंद झालेली आहे. पण तामिळनाडू आणि तेलंगाणा येथे मात्र पावसाची कमतरता होती आणि म्हणूनच सरासरीपेक्षा ४४% व ३०% तुटवड्याची नोंद करण्यात आली.

देशातील ३६ वातावरणीय-उपभागांपैकी फक्त ७ भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे. तसेच ८ भागात साधारण पावसाची नोंद झाली आहे आणि ९ भागात मात्र पावसाचा तुटवडा जाहीर करण्यात आला आहे.

पावसाचा अंदाज

जम्मूकाश्मीर या भागावर कमी दाबाच्या हवेची एक प्रणाली तयार होताना दिसत असून देशातील उत्तर व पूर्व भागात या आठवड्याच्या शेवटी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर चक्रवाती हवेचे क्षेत्र तयार होत असल्याचे दिसून आले असल्याने दक्षिणेतील द्वीपकल्पाच्या भागात पुढील आठवड्यात चांगल्याच पावसाची शक्यता आहे आणि यामुळेच आधी झालेल्या पावसाची तूट भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

image Credit: dnaindia.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try