[Marathi] सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये रडार च्या अभावामुळे चक्रीवादळ "वायू" च्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्यात अडचण

June 12, 2019 5:43 PM | Skymet Weather Team

या हंगामात देशाच्या दोन्ही किनाऱ्यांनी दोन शक्तिशाली चक्रीवादळ अनुभवलेत. पहिले म्हणजे चक्रीवादळ फोनी जे मेच्या सुरुवातीला ओडिशाला धडकले व राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

आता, चक्रीवादळ "वायू" जे अरबी समुद्रात तयार होऊन प्रत्येक मिनिटाला शक्तिशाली बनत उत्तर-उत्तर-पश्चिम पुढे जात आहे. ह्या चक्रीवादळाने आता अतिशय तीव्र चक्रीवादळाचे रूप घेतले असून सौराष्ट्राच्या किनाऱ्याकडे मार्गक्रमण करत आहे आणि उद्या सकाळी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. याकाळात चक्रीवादळ आपली तीव्रता टिकवून ठेवण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ द्वितीय श्रेणीच्या प्रकारात मोडते.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि बऱ्याच भागात पूर देखील येण्याची शक्यता आहे. शिवाय, शासनाने देखील चक्रीवादळ वायुच्या दृष्टीने तयारी करण्यास सुरवात केली आहे, कमीतकमी ३ लाख लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ संघटना देखील तैनात केली आहे.

दुर्दैवी गोष्ट म्हणजे, फोनी चक्रीवादळाची वाटचालीवर जय प्रकारे नजर ठेवता आली होती तशी वायू चक्रीवादळाच्या बाबतीत शक्य नाही. चक्रीवादळ शोध रडार (सीडीआर) द्वारे दर मिनिटाला चक्रीवादळांचा मागोवा घेतला जातो हि प्रणाली पूर्व किनाऱ्यावर पुरेशी उपलब्ध आहे. शिवाय, चेन्नई, मच्छलीपट्टणम, विशाखापट्टणम, कोलकाता येथे सीडीआर स्थापित आहेत. गोपाळपूर आणि पारादीप येथे देखील चक्रीवादळ शोध रडारचे एक नेटवर्क आहे.

याव्यतिरिक्त, पूर्व किनारीवरील रडार आच्छादित कव्हरेज प्रदान करतो ज्यामुळे जवळजवळ प्रत्येक मिनिटाला या प्रणाल्यांचा मागोवा घेणे सुलभ होते, जे फोनीच्या वेळी होते. हे रडार आपल्याला वास्तविक वेळची प्रतिमा देतात.

पूर्व किनाऱ्याच्या तुलनेत पश्चिम किनाऱ्यावर रडार कव्हरेजची कमतरता आहे. मुंबईनंतर, चक्रीवादळा वायू चा पाठपुरावा करण्यासाठी सीडीआर उपलब्ध नाही. भुज येथे रडार आहे परंतु सीडीआर नाही तर चक्रीवादळ जामिनावर येण्याचे ठिकाण भुज रडारच्या प्रभावी क्षेत्राबाहेर आहे.

त्यामुळे, प्रत्येक क्षणी चक्रीवादळ वायूचा माग काढणे शक्य होणार नाही. वायू चक्रीवादळाचा मागोवा घेण्यासाठी उपग्रह छायाचित्र असतील परंतु त्यांच्यात वास्तविकतेच्या तुलनेत काही अंतर असेल आणि अशा प्रकारे वास्तविक प्रतिमा प्रदान करण्यात सक्षम होणार नाहीत.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES