[Marathi] नागपूर, अकोला येथे कोरडे हवामान, गारपीटग्रस्त पिकांमध्ये किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता

February 15, 2018 4:14 PM | Skymet Weather Team

सलग दोन दिवस पाऊस  आणि गारपिटीनंतर, विदर्भात कोरड्या हवामानाने जागा घेतली घेतली आहे.  मागील २४ तासांत  विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रात  वातावरण कोरडे होते.

नुकत्याच झालेल्या  पावसामुळे, दिवसाच्या तापमानात घट झाली असून,  बऱ्याच जिल्यांमधे दिवसाचे तापमान सरासरीच्या खाली  ३-५ अंश   नोंदले गेले. किमान तापमान सुद्धा सरासरीपेक्षा २-४ अंशाने  कमी  नोंदले गेले.

मागील २४ तासांत, यवतमाळ, गोंदिया आणि अमरावती येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा  ५ अंश   सेल्सिअस ने कमी होते. सोबतच  नागपूर आणि वर्धा  येथील दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या  ४ अंश सेल्सिअस ने जास्त होते. अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर  येथील कमाल तापमानात ३ अंश ने घट झाल्याची निदर्शनासआले.

खरेतर,  नागपूर  येथील  किमान तापमान तापमान सरासरीच्या खाली ५ अंश एवढे  नोंदले गेले, तर गोंदियाचे तापमान सरासरीच्या ४ अंशने कमी होते.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर  च्या अनुमानानुसार, विदर्भातील हवामानात लक्षणीय बदल संभवत नाहीत, ज्यामुळे आकाश निरभ्र आणि स्वच्छ  सूर्यप्रकाश आहे.  ज्यामुळे दिवसाच्या  पुढील २-३ दिवसांत तापमानात थोडीशी वाढ  संभवते, तरीपण ते सरासरीच्या खालीच राहील. उत्तर पूर्व दिशेकडून येणारे  थंड  वारे विदर्भावरुन वाहत असल्यामुळे, किमान  तापमानात वाढ  संभवत नाही. हवामान थंड आणि आल्हाददायक राहील.

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

थोडक्यात, येत्या  काही दिवसात विदर्भात वातावरण शुष्क राहील.  रात्री आणि पहाट थंड राहतील तर दिवस उबदार राहतील.

शेतीसाठी शिफारस

पाऊस आणि गारपीटग्रस्त  शेतामध्ये स्वच्छता करावी. शेतकरी बांधवानी  जमीनदोस्त  झालेली  गहू, ज्वारी, हरभरा पिके  जमिनीपासून वेगळी करून  स्वच्छ करावीत. जर पिके कापण्यास  तयार असतील तर कापणी करावी.

गारपीटग्रस्त फळबागा आणि  भाजीपाला शेतामध्ये  तुटलेली  फांदी, व  इतर भाग कडून टाकावीत.  पिकावर  रोग पडू नये म्हणून  बुरशीनाशकाची फवारणी करावी.

Image Credit:  wikipedia           

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES