सध्याचे हवामान पाहता महाराष्ट्राला या उष्म हमानापासून आराम मिळेल असे चिन्ह दिसत नाही. खरं तर, राज्यातील बहुतांश भागात तापमान सतत सामान्य पेक्षा काही अंश जास्त आहे.
विदर्भ आणि मराठवाडा सारख्या भागात उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही अंशी अकोला जिल्हा तशीच परिस्थिती अनुभवत आहे.उर्वरित भागामधे सरासरीपेक्षा तापमान २ ते ४ अंशांनी जास्त असुन ते ४०अंशापर्यंत नोंदविले गेले आहे.
गुरुवारी,सर्वात जास्तीचे तापमान चंद्रपूर ४२. ४ अंश, त्यानंतर नांदेड ४२ अंश , परभणी येथे ४१. ९ अंश आणि नागपूर येथे कमाल तापमान दिवसाचे ४०. ९ एवढे नोंदविले गेले. सक्यमेट च्या हवामानानुसार महाराष्ट्रामधील विदर्भ ,मराठवाडा येथे सतत उष्णता वाढत असण्याचे एक म्हवातचे कारण म्हणजे कोरडे व उष्ण उत्तर पश्चिमी अंतर्देशीय वारे हे आहे.
[yuzo_related]
हे वारे गरम हवेच्या जास्त दाबाकडून म्हणजेच मध्य प्रदेश आणि गुजरात या शेजारच्या राज्यांतून वाहत येतात कि जिथे आधीच तापमान जास्त असते . या व्यतिरिक्त, संपूर्ण राज्यात कोरडे व उष्ण हवामान देखील वाढत आहे . Skymet हवामाननुसार किमान पुढील चार पाच दिवस महाराष्ट्र मध्ये हवामानामध्ये काही बदलाची शक्यता नाही. विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडून पारा पातळी खाली येऊन हवामानाची परिस्थिती थंड होऊ शकते.
विदर्भ आणि मराठवाडा मध्ये उष्म हवामानाचा कृषी घटकांवर होणारा परिणाम :
कारणउष्णतेच्या लाटेमुळे पीक नुकसान होऊ शकते ,फळे पूर्ण पक्क्व होण्याआधी गळून पडू शकतात ,त्यासाठी शेतकऱ्यांनी आवशक्य ती उपाययोजना करावी. शिवाय, फळझाडावर (ब्लॅक स्पॉट )काळा स्पॉट सारखा रोग येऊ शकतो, म्हणून शेतकऱ्यांनी वेळेवर कीटकनाशके फवारणी करावी करावा.
रोपांची छाटणी देखील रोग प्रादुर्भाव विरुद्ध वापरले जाऊ शकते.तापमान देखील उच्च आहे म्हणून, शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे कि त्या त्या पिकानुसार पानी देण्यात यावे आंबा आणि डाळिंब फळबागांना सुद्धा पानी देण्यात यावे. शेतकऱ्यांनी द्राक्षे व संत्र्याची काढणी चालू ठेवावी.
Image Credit: iclaa
Any information taken from here should be credited to skymetweather.com