[Marathi] औरंगाबाद, परभणी येथे कोरडे हवामान, गारपीटग्रस्त पिकांमध्ये स्वच्छता करावी

February 15, 2018 4:48 PM | Skymet Weather Team

विदर्भाप्रमाणेच, मराठवाड्यात सुद्धा पाऊस आणि गारपीट झाली असली तरी, गारपिटीची तीव्रता विदर्भापेक्षा कमी होती.  पाऊस  आणि गारपिटीमुळे  मराठवाड्यातील  कमाल  तापमानात लक्षणीय घट  झाली.

नुकत्याच झालेल्या  पावसामुळे, दिवसाच्या तापमानात घट झाली असून,  मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या खाली नोंदले गेले. कमाल तापमानात किंचित वाढ होऊन सुद्धा ते सरासरीच्या २-३  अंश खाली आहे. किमान तापमान सुद्धा सरासरीपेक्षा कमी  नोंदले गेले.

मागील २४ तासांत, नांदेड येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा  ३ अंश सेल्सिअसने कमी होते, तर परभणी येथील दिवसाचे कमाल  तापमान सरासरीच्या २ अंश खाली नोंदले गेले.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर  च्या अनुमानानुसार, मराठवाड्यातील हवामानात लक्षणीय बदल संभवत नाहीत.  वातावरण  पूर्णतः  कोरडे  राहील.  ज्यामुळे आकाश निरभ्र आणि स्वच्छ  सूर्यप्रकाश आहे.  पुढील २४ तासांत  दिवसाच्या तापमानात १-२ अंशाने  वाढ  संभवते,  किमान  तापमानात  पुढील २ दिवसांत वाढ संभवत नाही. त्यानंतर मात्र  किमान तापमानात  वाढ होईल.  रात्री आणि पहाट थंड राहतील तर दिवस उबदार राहतील.

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

शेतीसाठी शिफारस

पाऊस आणि गारपीटग्रस्त  शेतामध्ये स्वच्छता करावी. शेतकरी बांधवानी  जमीनदोस्त  झालेली  गहू, ज्वारी, हरभरा पिके  जमिनीपासून वेगळी करून  स्वच्छ करावीत. जर पिके कापण्यास  तयार असतील तर कापणी करावी.

गारपीटग्रस्त फळबागा आणि  भाजीपाला शेतामध्ये  तुटलेली  फांदी, व  इतर भाग कडून टाकावीत.  पिकावर  रोग पडू नये म्हणून  बुरशीनाशकाची फवारणी करावी.

Image Credit:  Instagram (Manav)            

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES