भारतात बऱ्याच ठिकाणी वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अंश से. पेक्षाही जास्त झालेला दिसत असून अजून तरी काही दिवस या उन्हाच्या धगीपासून सुटका होण्याचे कोणतेच लक्षण दिसलेले नाही.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेनुसार भारतातील सागरी किनारपट्टी कडील क्षेत्र व उत्तर पूर्वेकडील भाग वगळता सर्व ठिकाणी उष्ण लहरीचा प्रकोप असून तीव्र उष्णता आणि हैराण करणाऱ्या उकाड्याला सामोरे जावे लागत आहे आणि तेथील तापमानाचा पारा ही ४० अंश से. पेक्षा जास्त आहे.
सद्यस्थितीत वातावरणात कुठलीच वेगळी हालचाल किंवा प्रणाली विकसित होताना दिसत नसून तापमानात कमालीची वाढ घडवून आणणारे ईशान्य दिशेकडून येणारे उष्ण व कोरडे वारे मात्र बऱ्याच भागांवर वाहत आहे.
रविवारी घेतलेल्या संपूर्ण देशातील तापमानाच्या नोंदी ह्या ४० अंश से. पेक्षा जास्तच दिसून आल्या. काही महत्त्वाच्या ठिकाणचे तापमान पुढीलप्रमाणे
देशाची राजधानी दिल्ली येथे ४० अंश से. तर राजस्थानातील जैसलमेर येथे ४३.७ अंश से.आणि जोधपुर येथे ४३.५ अंश से. तापमान होते.
महाराष्ट्रातील अकोला, नागपूर, सोलापूर येथे अनुक्रमे ४३.९, ४३, ४२.७ अंश से. इतके तापमान होते.
गुजरात मधील अमरेली आणि राजकोट येथे अनुक्रमे ४४ आणि ४३.८ अंश से. तापमानाची नोंद केली गेली.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर आणि भोपाल येथेही अनुक्रमे ४१.३, ४०.४ अंश से. तापमान होते.
उत्तरप्रदेशच्या झासी आणि आग्रा येथेही ४० अंश से. तापमान होते, तसेच झारखंड, ओरिसा, बिहार, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश येथेही पारा ४० अंश से. पेक्षा वरच होता.
मे महिना हा नेहमीच उष्ण असतो आणि मार्च आणि एप्रिल यंदा तरी सुखदायक पार पडला आहे. यंदा आलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील तापमान जरा आटोक्यात असलेले अनुभवायला मिळालेले आहे. पण यापुढे मात्र कुठलीच नवीन प्रणाली दिसत नसून तापमानात वाढ होताच राहणार आहे.
तसेच मध्य आणि पूर्व भारतातही आता चक्रवाती हवेचा कमी दाबाचा पट्ट्याचा परिणाम कमी झालेला असून तेथेही तापमानात एकदम वाढ होईल असा अंदाज आहे.
दक्षिण भारतात मात्र पावसाची हजेरी लागतच राहील कारण तेथे कमी हवेचा दाब व पूर्व मान्सून लहर या दोन्हीमुळे दिवसाच्या वातावरणात फार फरक पडला नाही तरी संध्याकाळी पाऊस होऊन रात्रीच्या तापमानात बदल होत राहतील.
स्कायमेट ने दिलेल्या अंदाजानुसार या तीव्र गरमी व उकाड्यापासून सध्यातरी १० मे च्या पुढेच विश्रांती मिळेल तसेच या रणरणत्या उन्हाळा आणि असह्य उकाड्याचा धीराने सामना करावा आणि योग्य ती काळजी घ्यावी.
Image Credit: daylifeimages.com