Skymet weather

[Marathi] औरंगाबाद, नांदेड येथे शुष्क हवामान, पाऊस आणि गारपीटग्रस्त फळबागांची जोपासणा करावी

February 20, 2018 5:17 PM |

aurangabad post

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा विभागात   पाऊस आणि गारपीट झाली.  त्यानंतर इथे  हवामान कोरडे राहिले. शुष्क  वातावरणामुळे,  तापमानात वाढ होऊन, तापमान  सरासरीच्या वर नोंदले जात आहे. मागील २४ तासांत  हवामानात फार्रसे बदल झाले नसून, कमाल तापमान सरासरीच्या  तुलनेत जास्त नोंदले.  जसे कि, औरंगाबाद  आणि परभणी इथे  मागील २४ तासांत  कमाल तापमान  अनुक्रमे  ३४.१ °C  आणि ३४. १ °C  नोंदले गेले,   जे   सरासरीच्या तुलनेत ३ °C जास्त  होते. पाऊस घेऊन येणारी कोणतीही  प्रणाली अस्तित्वात  नसल्यामुळे हवामान  शुष्क आणि उष्ण  राहिले.

सद्यस्थितीत  मराठवाडा आणि परिसरावर पाऊस  घेऊन  येणारी प्रणाली तयार होत नसल्यामुळे वातावरण  शुष्क राहील.  सध्या हवामान पूर्णतः  कोरडे आहे. पावसाच्या अनु-उपस्थितीमुळे आकाश निरभ्र असून स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, ज्यामुळे तापमानात  उल्लेखनीय  वाढ झाली.

[yuzo_related]

कमाल  तापमान  आता वाढत असून ३०-३५°C  च्या  दरम्यान  स्थिरावत  आहे. किमान तापमानात  सुद्धा  १-२°C  ने वाढ होऊन, रात्री  सुद्धा गरमपणा  जाणवेल.

शेतीसाठी शिफारस

मराठवाडा विभागात,  फेब्रुवारीच्या  दुसऱ्या  आठवड्यात गारपिट झालेल्या केळी, संत्रा, मोसंबी, द्राक्ष  डाळिंब आणि लिंबाच्या  फळबागेमधे  स्वच्छता करावी. कोरड्या आणि निरभ्र  हवामानामुळे  कुजलेली  फळे, पाने फांद्या  बागेमधून काढून  बॅग स्वच्छ करावी.

आंबे बहार असलेलया फळपिकात  योग्य  नियोजन करावे. पिकास आवश्यकतेनुसार  पाणी दयावे.  पक्व  झालेल्या संत्रा, द्राक्ष, डाळिंब आणि लिंबाची  तोडणी करावी. तोडलेली फ़ळे  योग्य  पद्धतीने  हाताळावे.

Image Credit: holidify.com            

Any information taken from here should be credited to skymetweather.com 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try