नेपाळमध्ये काल झालेल्या भीषण भूकंपामुळे अंदाजे २००० लोकांनी आपले प्राण गमावलेले असताना आज पुन्हा नेपाळला भूकंपाचा हादरा बसला. अमेरिकेतील भूविज्ञान संस्थेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे १२.४५ मिनिटांनी ६.७ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला. आजच्या भूकंपाचे केंद्र हे नेपाळमधील कोदारी च्या दक्षिण पूर्वेस ३१ किमी अंतरावर असून काठमांडू पासून ८५ किमी अंतरावर आहे. माउंट एवरेस्ट वर गेलेल्या गिर्यारोहकांनी पुन्हा एकदा बर्फाचे कडे कोसळणे आणि हिमस्खलनाचा अनुभव घेतला.
या दुसऱ्या भूकंपाचे हादरे हे भारतातही जाणवले. भारतात दिल्ली एनसीआर, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहार येथे तीव्रतेन जाणवले. याची तीव्रता अधिक असल्याने या भागातील लोकांना घर आणि इमारती रिकाम्या करून उघड्या आणि मोकळ्या जागी जाऊन थांबणेच योग्य वाटले. तसेच दिल्लीतील मेट्रो सेवाही काही काळ बंद करण्यात आली होती. भूकाम्पौत्तर येणारे हादरे अजूनही जाणवतील तरी लोकांनी घाबरून न जाता सावधान मात्र राहावे.
Image Credit (nbcnews.com)