हवामान अंदाज 9 सप्टेंबर: मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यात आणि विदर्भात मध्यम सरींची शक्यता

September 8, 2019 6:37 PM | Skymet Weather Team

मध्य भारतापासून सुरुवात करूया, कमी दाबाचा क्षेत्र उत्तर पूर्व मध्य प्रदेशवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेश मध्ये काही ठिकाणी आणि दक्षिण उत्तर प्रदेशात एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर चक्रवाती परिस्थिती आहे. त्याचबरोबर, एक ट्रफ रेषा गुजरात ते उत्तर केरळ पर्यंत विस्तारित आहे. यामुळे, सौराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. पाणी साचल्याने काही अडचणी निर्माण होऊ शकतात.तसेच, विदर्भात देखील मध्यम सरींची शक्यता आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतात, चक्रवाती परिस्थिती आसामवर आहे. यामुळे उप हिमालयी पश्चिम बंगाल, लोअर आसाम आणि पूर्व बिहार मध्ये एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि उर्वरित ईशान्य भारतातही हलका ते मध्यम पाऊस पडेल. गुवाहाटीसारख्या एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

उत्तर भारतात, एक कमकुवत पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरच्या आसपास आहे. ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये एक दोन हलक्या सरींची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थान हे मुख्यतः कोरडे राहील. पूर्व राजस्थान मध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ढगाळ वातावरणासह दिल्ली मध्ये हवामान खूप उबदार व दमट राहील. पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडेल तर पश्चिम भाग बहुतेक कोरडे राहील.

दक्षिण भारतात, गुजरातपासून केरळपर्यंत ट्रफ रेषा विस्तारलेली आहे ज्यामुळे. कर्नाटक आणि उत्तर केरळमध्येही हलका पाऊस पडेल. दुसरीकडे, तामिळनाडू, रायलसीमा, दक्षिण तेलंगाणा, चेन्नई आणि आंध्र प्रदेश मधील हवामान कोरडे व उबदार राहील. उत्तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हलक्या सरी पडतील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES