Skymet weather

हवामान अंदाज 28 सप्टेंबर: मुंबई, नागपूर आणि अकोला येथे हलका विखुरलेला पाऊस अपेक्षित

September 27, 2019 6:26 PM |

देशाच्या पूर्वेकडील भागात, पूर्व-पश्चिम ट्रफ रेषा हरियाणा ते ईशान्य भारता पर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या ठिकाणी एक ते दोन जोरदार गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसामुळे बिहार मध्ये पूर परिस्थिती तीव्र होऊ शकते.

पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसामच्या काही भागांत एक किंवा दोन मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. उर्वरित ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच चक्रवाती परिस्थिती कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये आणखी तीव्र झाली आहे, ज्यामुळे गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वीज कोसळण्याची शक्यता आहे.

देशाच्या मध्य भागात, अरबी समुद्रापासून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे व पूर्व-पश्चिम ट्रफ रेषांच्या उपस्थितीमुळे पूर्व आणि ईशान्य मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच भागात पाऊस कमी होईल आणि विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल पण गुजरात, दक्षिण आणि दक्षिणपूर्व राजस्थानमध्ये एक किंवा दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस सुरू राहील. मुंबई, नागपूर आणि अकोला येथे हलका विखुरलेला पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तरेकडील भागात, जम्मू-काश्मीरमध्ये एक पश्चिमी विक्षोभ आहे, प्रभावाने मध्य पाकिस्तानवर चक्रवाती परिस्थिती आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा येथे विखुरलेला हलका पाऊस पडू शकतो.

दक्षिणेकडील भागात हवामानाची कोणतीही महत्त्वपूर्ण व्यवस्था नाही. तरीही आम्ही तेलंगणा, किनार्यावरील कर्नाटक, केरळ व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी अपेक्षा करतो. रायालसीमा, अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू या भागात पाऊस कमी होईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try