हवामान अंदाज 27 सप्टेंबर: मुंबईत एक दोन तीव्र सरींसह काही ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित

September 26, 2019 6:22 PM | Skymet Weather Team

मध्य भारतापासून सुरुवात केली तर सध्या दक्षिण गुजरात किनाऱ्यालगत ईशान्य अरबी समुद्रावर चक्रवाती परिस्थिती आहे. या प्रणाली पासून एक ट्रफ रेषा उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे दक्षिण गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.पूर्व आणि उत्तर मध्य प्रदेश तसेच उत्तर छत्तीसगडमध्ये एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस सुरू राहील. दक्षिण छत्तीसगड, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिणपूर्व राजस्थानमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मान्सून कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमकुवत होऊन जाईल. तथापि, येथे काही हलक्या सरी दिसू शकतात आहे.मुंबईत एक दोन तीव्र सरींसह काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

पूर्व आणि ईशान्य भारतात, एक पूर्व-पश्चिम ट्रफ रेषा मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगलाच्या जवळ विस्तारित आहे. यामुळे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत जोरदार पाऊस पडेल. तसेच पूर्व उत्तर प्रदेशात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन मध्यम सरींसह विखुरलेला हलका पाऊस संपूर्ण ईशान्य भारतामध्ये शक्य आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

दक्षिण भारतात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि रायलासीमा या भागांत पाऊस कमी होईल. या राज्यात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एक ते दोन मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. कोलकाता आणि हैदराबादमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात, पूर्वेकडील उष्ण वारा वाहत आहे. अशाप्रकारे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात विखुरलेला पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर राजस्थानमधील हवामान कोरडे राहील. रांची, जमशेदपूर, वाराणसी, गया येथे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES