हवामान अंदाज 26 सप्टेंबर: नागपूर आणि मुंबईत हलका ते मध्यम पाऊस

September 25, 2019 6:25 PM | Skymet Weather Team

पूर्व-पश्चिम ट्रफ रेषा पूर्वोत्तर अरबी समुद्रापासून बिहार पर्यंत विस्तारित आहे. म्हणूनच, बिहार आणि दक्षिणपूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रवाती परिस्थिती आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. ओडिशामध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ईशान्य भारतात पावसाची तीव्रता आणखी कमी होईल आणि एक किंवा दोन मध्यम सरींसह बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडेल.

देशाच्या मध्य भागात, चक्रवाती परिस्थिती महाराष्ट्र किनारपट्टीच्या पूर्वेकडील अरबी समुद्रावर आहे. एक ट्रफ रेषा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या जवळ विस्तारित आहे.

त्यामुळे मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, विदर्भातील काही भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, गुजरात क्षेत्रात आणि सौराष्ट्र या ठिकाणी एक किंवा दोन मुसळधार सरींची शक्यता आहे. दक्षिण छत्तीसगडसह पूर्व राजस्थान, कोकण आणि गोवा या ठिकाणी विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जबलपूरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस तर नागपूर, भोपाळ आणि अहमदाबादमध्ये मध्यम पडू शकतो.

देशाच्या दक्षिणेकडील भागात, उत्तर-कोकण ते केरळ पर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारित आहे. कोस्टल कर्नाटक आणि केरळमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस संभव आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर तेलंगणाच्या उत्तर जिल्ह्यांत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.अंदमान आणि निकोबारद्वीपसमूहावर मध्यम ते मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.

देशाच्या उत्तरेकडील भागात, दमट वारा सुरू राहण्यामुळे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये काही ठिकाणी विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाची तीव्रता किरकोळ वाढेल. उत्तर-पश्चिम राजस्थानमधील हवामान कोरडे राहील तर दिल्लीत एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES