Skymet weather

हवामान अंदाज 25 सप्टेंबर: महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

September 24, 2019 6:48 PM |

देशाच्या मध्य भागात चक्रवाती परिस्थिती गुजरातवर आहे आणि एक ट्रफ रेषा गुजरातपासून बंगालच्या उपसागरापर्येंत विस्तारित आहे. त्यामुळे दक्षिण व पूर्व गुजरात, महाराष्ट्रातील बऱ्याच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्येही एक ते दोन मध्यम सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात पाऊस तुलनेने कमी राहील आणि कच्छ येथे फक्त हलका पाऊस पडेल. मुंबई शहरात मध्यम सरी पडू शकतात.

देशाच्या पूर्वेकडील भागात, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या भागात पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे आणि येथे एक ते दोन मुसळधार सरी देखील दिसू शकतात. पश्चिम बंगाल आणि किनारपट्टी ओडिशामध्येही असेच हवामान राहील.

ओडिशा आणि झारखंडमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडेल. ईशान्य भारतात पाऊस कमी होईल आणि फक्त एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दक्षिण मध्ये चक्रवाती परिस्थिती दक्षिण पूव अरबी समुद्र आणि लगतच्या केरळच्या किनारी भागांवर आहे, त्यामुळे, कोस्टल कर्नाटक, केरळ आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस संभव आहे. कर्नाटकातील अंतर्गत भागात, रायलसीमा आणि तेलंगणाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल तर किनारपट्टी आंध्र प्रदेशात एक किंवा दोन मुसळधार सरींची शक्यता आहे.

उत्तरेकडील भागात, एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर आहे आणि पूर्व दिशेने येणारे वारे ओलावा वाढवत आहेत. म्हणूनच, उत्तर-पश्चिम भारतामध्ये पाऊस वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या भागांमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. दिल्ली आणि एनसीआरमध्ये एक दोन ठिकाणी काही हलक्या सरी दिसू शकतात.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try