हवामान अंदाज 24 सप्टेंबर: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यत

September 23, 2019 7:31 PM | Skymet Weather Team

किनार्यावरील आंध्र प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागात कमी दाबाचा क्षेत्र आहे. एक ट्रफ रेषा या प्रणालीपासून राजस्थान पर्यंत विस्तारित आहे.छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य प्रदेशात काही भागांत एक किंवा दोन मुसळधार सरीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर गुजरात प्रदेश, सौराष्ट्र आणि दक्षिणपूर्व राजस्थानमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडेल. कोकण आणि गोवा येथे मान्सूनच कमकुवत राहील.तामिळनाडू, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. चेन्नई आणि हैदराबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

देशाच्या पूर्वेकडील भागात, बंगालच्या उपसागरापासून आर्द्र वारे पूर्व भारताला प्रभावित करीत आहे. त्यामुळे ओडिशा, गंगीय पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये पावसाचा जोर वाढेल. पूर्व बिहार आणि उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये एक किंवा दोन जोरदार सरी पडू शकतात. तर पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य राज्यांतील पावसाच्या हालचाली आता कमी होतील पण आसाम, नागालैंड आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडत राहील.

उत्तरेकडील कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली नाही आहे. तथापि, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच पश्चिम उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे तर जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे काही ठिकाणी पाऊस पडेल. पश्चिम राजस्थानचे हवामान कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES