Skymet weather

हवामान अंदाज 21 सप्टेंबर: मुंबईसह कोंकण व गोव्यात मध्यम सरींची शक्यता

September 20, 2019 6:50 PM |

कमी दाबाचा क्षेत्र महाराष्ट्र आणि गुजरात किनाऱ्यापासून पूर्व अरबी समुद्रावर आहे. एक ट्रफ रेषा तेलंगणापर्येंत विस्तारलेली आहे. अशा प्रकारे सौराष्ट्र आणि गुजरात मध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस सौराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात पडू शकतो. तर छत्तीसगड, विदर्भ आणि दक्षिणपूर्व राजस्थानच्या काही भागात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. मराठवाड्यासह कोकण आणि गोवा येथेही आता पाऊस कमी होईल. परंतु, कोंकण व गोव्यात काही मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईत काही ठिकाणी मध्यम सरी बरसतील.

दक्षिण मध्ये, बंगालच्या उपसागराच्या मध्य भागांवर चक्रवाती परिस्थिती आहे आणि येथून आंध्र प्रदेशपर्यंत ट्रफ रेषा विस्तारलेली आहे. त्यामुळे तटीय आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडू आणि रायलासीमा येथेही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. कर्नाटकच्या अंतर्गत भागांवर मान्सून कमकुवत राहील. परंतु कर्नाटक आणि केरळमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर मॉन्सून सक्रिय राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

देशाच्या पूर्वेकडील भागात, बिहार आणि झारखंडमध्ये मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. या दरम्यान पश्चिम बंगालमध्येही विखुरलेला पाऊस पडेल ज्यामध्ये कोलकातामध्ये हलका पाऊस किंवा गडगडाटी पाऊस पडेल. तथापि, ओडिशामध्ये पाऊस कमी होईल. आसाम, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये हलक्या सरी बरसतील तर उर्वरित ईशान्येकडील राज्यांत हलका पाऊस पडेल.

उत्तरेकडील भागांमध्ये मध्य पाकिस्तानवर चक्रवाती परिस्थिती आहे. तथापि, पश्चिम राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामधील बहुतेक भागांत हवामान कोरडे राहील. पश्चिम उत्तर प्रदेशात एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या भागांत विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try