हवामान अंदाज 18 सप्टेंबर: मुंबईत हलका पाऊस, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस

September 17, 2019 7:30 PM | Skymet Weather Team

चक्रवाती परिस्थिती दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या उत्तर मध्य प्रदेशात आहे आणि मान्सूनची अक्षीय रेषा बंगालच्या खाडीपर्यंत विस्तारलेली आहे. त्यामुळे पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांत एक किंवा दोन जोरदार गडगडाटीसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, दक्षिण गुजरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. मुंबईत हलका पाऊस पडेल आणि व उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

दक्षिण-पश्चिम बंगालमध्ये एक चक्रवारती परिस्थिती आहे, त्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या अंतर्गत भागातही काही प्रमाणात मध्यम पाऊस पडेल. केरळ, तटीय कर्नाटक, तामिळनाडू येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

देशाच्या पूर्वेकडील भागांत, बिहार आणि उप-हिमालयी पश्चिम बंगालमध्ये पाऊस कमी होईल पण पूर्व उत्तर प्रदेशात मध्यम पाऊस पडेल.तर, ईशान्य भारत, झारखंड, ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये पाऊस कमी होईल. एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडत राहील.

संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात मान्सून कमकुवत राहील. उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांत विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील बहुतेक भागातील हवामान कोरडे राहील. दिल्ली आणि एनसीआरमध्ये एक किंवा दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES