हवामान अंदाज 13 सप्टेंबर: विदर्भात हलका ते मध्यम पाऊस, मध्य महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस

September 12, 2019 6:05 PM | Skymet Weather Team

मध्य भारतापासून सुरुवात केली तर, कमी दाबाचा क्षेत्र दक्षिण उत्तर प्रदेशवर आहे आणि ट्रफ रेषा दक्षिण गुजरातपासून मध्य प्रदेश पर्येंत विस्तारलेली आहे. मध्य प्रदेशातील बर्

याच भागात मध्यम पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. तर दक्षिण गुजरात, कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल. विदर्भ आणि दक्षिणपूर्व राजस्थानमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतात, मान्सूनची अक्षीय रेषा उत्तरपूर्व भारत, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत विस्तारली आहे. अशा प्रकारे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उप हिमालयीय पश्चिम बंगाल आणि सिक्किम येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि ईशान्य भारतातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

दक्षिण भारतात, कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणाली नसताना मान्सून अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्ये कमकुवत राहील. चेन्नई आणि हैदराबादमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, कोस्टल कर्नाटक, उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात मध्यम सरी पडू शकतात. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये उत्तर प्रदेशातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानचे हवामान कोरडे व उबदार राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES