कमी दाबाचा पट्टा पूर्व उत्तर प्रदेशवर आहे आणि मान्सूनची अक्षीय रेषा हरियाणापासून ईशान्य भारतापर्यंत विस्तारलेली आहे. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
देशाच्या मध्य भागांत कमी दाबाच्या क्षेत्राच्या पट्टा पूर्व आणि ईशान्य मध्य प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस देईल. पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातचा काही भागांत तसेच विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण आणि गोवा येथे पाऊस कमी होईल आणि मान्सूनचा प्रभाव कमी झाल्याने कच्छ, पश्चिम राजस्थान आणि मराठवाड्यात पाऊस कमी होईल. मुंबई मध्ये हलका पाऊस सुरु राहील.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिणेकडे ,किनारपट्टी कर्नाटक आणि केरळवरील उपस्थित असलेली ट्रफ रेषा कमकुवत झाली आहे. म्हणूनच, पावसाळी गतिविधींमध्ये घट होईल. तथापि, कोस्टल कर्नाटक, केरळ आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि अंतर्गत तमिळनाडूच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमान निकोबार द्वीपहावर मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील, संपूर्ण उत्तर भारतात मान्सून कमकुवत होईल. देशाच्या उत्तर पश्चिमी भागांवर हवामान जवळजवळ कोरडे होईल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरड्या वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.
Any information taken from here should be credited to skymetweather.com