ईशान्य मध्य प्रदेश आणि दक्षिणपूर्व उत्तर प्रदेश मध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि गुजरात मधील बर्याच भागात एक किंवा दोन मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. दक्षिण-पूर्व राजस्थान आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्र आणि कोंकण व गोव्यात आता पाऊस कमी होईल. छत्तीसगडच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत हलक्या पावसासह एक दोन ठिकाणी मध्यम सरींची अपेक्षा आहे.
देशाच्या पूर्वेकडील भागात चक्रवाती परिस्थिती पूर्व आसामवर आहे आणि मान्सूनची अक्षीय रेषा उत्तरेकडे जाईल. अशा प्रकारे, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांत पावसाचा जोर वाढेल.
झारखंड, ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये विखुरलेला पाऊस पडेल.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण मध्ये कोकण आणि गोव्यापासून केरळपर्यंत एक किनार्यावरील ट्रफ रेषा आहे. त्यामुळे कोस्टल कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये एक किंवा दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेलंगणाच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊसही दिसू शकतो.
जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात कोणत्याही महत्त्वपूर्ण पावसाची आम्हाला अपेक्षा नाही आहे. या प्रदेशांमध्ये हवामान कोरडे, उबदार व दमट राहील.
तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात विखुरलेला पाऊस पडू शकतो
Any information taken from here should be credited to skymetweather.com