Skymet weather

हवामान अंदाज 4 सप्टेंबर: नागपूर, गोंदिया, मुंबई येथे मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित

September 3, 2019 6:55 PM |

ओडिशा आणि लगतच्या छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. हि हवामान प्रणाली उत्तर पश्चिम दिशेत पुढे जात आहे. शिवाय, मान्सूनची ट्रफ रेषा राजस्थान ते मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाला ओलांडून बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे.

देशाच्या मध्य भागात, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडच्या काही भागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात, कोकण आणि गोवा आणि दक्षिण-पूर्व राजस्थानच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया, मुंबई, रत्नागिरी येथे मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विखुरलेला पाऊस पडू शकतो.

पूर्व भारतात,ओडिशा, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या ठिकाणी एक किंवा दोन जोरदार गडगडाटीसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतामध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल, बिहार आणि झारखंडमधील काही भागात तसेच पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशवर हलक्या ते मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात, चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल आणि पंजाब आणि हरियाणासह पश्चिम उत्तर प्रदेशात विखुरलेला पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांत जम्मू-काश्मीरवर एक-दोन मुसळधार सरींची शक्यता आहे.

दक्षिण मध्ये, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर ट्रफ रेषा उपस्थित आहे.ज्यामुळे कोस्टल कर्नाटक आणि केरळमध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. आणि आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try