Skymet weather

हवामान अंदाज 5 ऑक्टोबर: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस

October 4, 2019 5:57 PM |

चक्रवाती परिस्थिती तामिळनाडूच्या भागांवर आहे आणि एक ट्रफ रेषा या परिस्थिती पासून उत्तर आंतरिक कर्नाटकपर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे रायलासीमा, अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू या भागांमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व भारतात, ज्यात चक्रवाती परिस्थिती बांगलादेश व त्याच्या आसपासच्या भागांवर आहे आणि एक ट्रफ रेषा किनार्यावरील आंध्र प्रदेशपर्यंत विस्तारित आहे, ज्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि ईशान्य भारतातील काही भागात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात कोरड्या हवामानासह सिक्कीम आणि बिहारमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलकाता, रांची येथे हलका पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

देशाच्या मध्य भागात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश व दक्षिण गुजरातमध्ये एक एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर सौराष्ट्र आणि कच्छचे हवामान कोरडे राहील.

शेवटी, उत्तरेकडील भागात, पश्चिम पाकिस्तान आणि आसपास पश्चिमी विक्षोभ आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये विखुरलेला पाऊस पडेल तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील हवामान कोरडे असेल परंतु स्थानीय पावसाची शक्यता नाकारता येत नाही. चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पश्चिम राजस्थानात दिसून येत आहे. यामुळे पश्चिम आणि दक्षिण राजस्थानच्या काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try