दक्षिण भारतात, चक्रवाती परिस्थिती उत्तर श्रीलंका किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरात आहे. या प्रणालीपासून एक ट्रफ रेषा तामिळनाडूपर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील भागांवर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कराईकल, नागापट्टिनम, पंबन यासारख्या ठिकाणी पुढील २४ तासांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी एक किंवा दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान चेन्नईमध्ये हलकी ते मध्यम सरी दिसतील. तामिळनाडूच्या अंतर्गत भागात हलका विखुरलेला पाऊस पडेल. केरळच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांप्रमाणे मध्यम सरी दिसू शकतात.
दरम्यान, आपल्या देशाच्या मध्य भागांमध्ये, अत्यंत तीव्र चक्रीवादळ क्यार पश्चिमेकडे सरकले आहे, म्हणूनच महाराष्ट्र किनारपट्टीवरील त्याचा प्रभाव कमी झाला आहे. पावसाळी गतिविधी मंदावली असून आता एक दोन मध्यम सरींसह हलका पाऊस मध्य महाराष्ट्रात दिसू येईल. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा येथे हलका विखुरलेला पाऊस पडू शकतो. गुजरात, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशात विखुरलेला पाऊस पडेल. राजस्थानमधील दक्षिणेकडील जिल्ह्यांतही एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल. या दरम्यान अहमदाबाद व पुणे येथे हलका पाऊस तर नागपुरात कोरडे हवामान दिसेल.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
पूर्व भारतात, उत्तर ओडिशामध्ये विपरीत चक्रवाती परिस्थिती तयार झाल्यामुळे हवामानातील हालचाली कमी झाल्या आहेत. झारखंड, ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमधील एक-दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात कोरडे हवामान होण्याची शक्यता आहे.
शेवटी, उत्तर पश्चिम मैदानावर उत्तर पश्चिमी दिशेने येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात घट होईल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामान कोरडे राहील.दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषण आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे आणि वाईट वर्गात येण्याची शक्यता आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com