हवामान अंदाज 27 ऑक्टोबर: चक्रीवादळ क्यारच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता

October 26, 2019 6:21 PM | Skymet Weather Team

दक्षिण भारतापासून सुरुवात करूया, दक्षिण श्रीलंका किनाऱ्यापासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये चक्रवाती परिस्थिती आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील भागांवर एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यावेळी चेन्नईमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, कन्याकुमारी, कराईकल या दक्षिणेकडील जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी दिसू शकतात.केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात एक-दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडेल. दुसरीकडे, तेलंगाणा, रायलसीमा आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशात एक किंवा दोन मध्यम सरींसह विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, मध्य भारतात, अति तीव्र चक्रीवादळ क्यार आता ओमानकडे वळत आहे. तथापि, त्याचा परिणाम गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टीवरील भागांवर मध्यम ते जोरदार वाऱ्यांच्या स्वरूपात दिसून येईल. याद्वारे समुद्राची स्थिती मध्यम ते वाईट होईल. कोकण आणि गोवा मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरु राहील. गुजरात, तसेच सौराष्ट्र आणि कच्छ येथे हलका विखुरलेला पाऊस पडेल. मराठवाडा, विदर्भ आणि छत्तीसगडच्या काही भागांत एक किंवा दोन मध्यम सरींसह विखुरलेला पाऊस पडेल. दक्षिण आणि दक्षिणपूर्व मध्य प्रदेशात विखुरलेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या बर्‍याच भागांसह मध्य प्रदेशातील उत्तरेकडील जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

कोणतीही मुख्य हवामान प्रणाली नसताना संपूर्ण ईशान्य भारताचे हवामान जवळजवळ कोरडे राहील. पश्चिम आसाममध्ये खालच्या पातळीवर चक्रवाती परिस्थिती अजूनही कायम असल्याने पाऊस कमी होईल. तथापि, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पूर्व आसाम आणि मेघालयात हलका विखुरलेला पाऊस संभव आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील पाटणा, गया येथे कोरडे हवामान होण्याची शक्यता आहे. झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांत एक किंवा दोन मध्यम सरींसह विखुरलेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आपल्या देशाच्या वायव्य मैदानावरील हवामान कोरडे राहील. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही असेच हवामान होण्याची शक्यता आहे. दिल्ली मध्ये प्रदूषण मध्यम ते वाईट श्रेणीत असेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES