हवामान अंदाज 14 ऑक्टोबर: विदर्भात हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत हवामान कोरडेच

October 13, 2019 7:53 PM | Skymet Weather Team

गेल्या चोवीस तासांत नैऋत्य मॉन्सूनने देशातील बऱ्याच भागांतून माघार घेतला आहे आणि सध्या माघारीची रेषा किशनगंज, बांकुरा, जमशेदपूर, चंपा, सिवनी, खरगोन, बारुच आणि दीवमधून जात आहे. मान्सूनने बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, तसेच छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील काही भागातून माघार घेतला आहे.

दक्षिण भारतात, चक्रवाती परिस्थिती आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर विस्तारित आहे. एक ट्रफ रेषा या प्रणालीपासून तामिळनाडूपर्यंत विस्तारत आहे. या प्रणालीमुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमधील एक दोन ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

मध्य भारतात येताना छत्तीसगडच्या दक्षिण व मध्य भाग तसेच विदर्भामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील उत्तरेकडील भाग कोरडे राहील. भोपाळ व मुंबईतील हवामानही कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

पूर्व आणि ईशान्य भारताबद्दल सांगायचे तर येथे चक्रवाती परिस्थिती उत्तर आंध्र प्रदेशवर आहे. अशा प्रकारे ओडिशाच्या मध्य आणि दक्षिण भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये हवामान कोरडे राहील. तसेच, चक्रवाती परिस्थिती बांगलादेश आणि त्रिपुराच्या आसपासच्या भागांवर आहे. या प्रणालीमुळे सिक्कीम, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूरमध्ये विखुरलेल्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलकाता कोरडे व उबदार राहील.

शेवटी उत्तर भारतात कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वायव्य भारतातील मैदानावर कोरडे हवामान राहील. दिल्लीत प्रदूषण मध्यम श्रेणीत राहील. दिवस काही ढगांसह उबदार होईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES