उत्तर भारतापासून सुरुवात करूया, पश्चिमी विक्षोभ आता पूर्वेकडे सरकला आहे, परंतु हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांत मेघगर्जनेची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारा पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या बऱ्याच भागात वाहील ज्यामुळे किमान तापमानात दोन ते चार अंशानी घट दिसून येईल. दरम्यान, दिल्लीतील हवामान कोरडे राहील.
दक्षिण भारतात, इशान्य मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. म्हणूनच, किनारपट्टी तामिळनाडू आणि दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशच्या काही भागांत एक किंवा दोन मुसळधार सरींची अपेक्षा आहे. तामिळनाडूमध्येही पाऊस वाढेल. केरळ, किनारपट्टी व दक्षिण कर्नाटक तसेच रायलासीमा येथे विखुरलेला पाऊस पडेल. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. कोची येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हैदराबाद, उत्तर कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेश कोरडे राहतील.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
मध्य भारतात, उत्तर दिशेकडून थंड वारे वाहतील ज्यामुळे गुजरात, दक्षिण राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील किमान तापमानात घट दिसून येईल. एक ट्रफ दक्षिण कोकण आणि गोवा ते केरळ पर्यंत विस्तारित आहे, म्हणून दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतच्या उर्वरित भागात आणि मुंबईत हवामान कोरडे राहील.
पूर्व भारतामध्ये, चक्रवाती परिस्थिती पूर्व बांगलादेश आणि त्याच्या आसपासच्या त्रिपुरा मध्ये आहे. अरुणाचल प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. तर, पूर्वोत्तर तसेच पूर्व भारतातील उर्वरित भागांचे हवामान कोरडे राहील. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये तापमानात बदल होण्याची आम्हाला अपेक्षा नाही आहे. दरम्यान, कोलकाता आणि रांची कोरडे राहतील.
Any information taken from here should be credited to skymetweather.com