हवामान अंदाज 18 नोव्हेंबर: तामिळनाडू मध्ये पाऊस, मुंबईत हवामान कोरडेच

November 17, 2019 6:04 PM | Skymet Weather Team

दक्षिण भारतपासून सुरुवात करूया, एक ट्रफ दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरापासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारित आहे. तामिळनाडू, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतात, चक्रवाती परिस्थिती आसामच्या पूर्वेकडील भाग आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रांवर आहे, ज्यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि नागालैंड मध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. ईशान्य भारतातील इतर भागात अंशतः ढगाळ आकाश असून हवामान कोरडे राहील. एक किंवा दोन ठिकाणी सकाळच्या वेळी धुके दिसू शकतात. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा तसेच कोलकाता शहरही कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ लडाखच्या पूर्वेकडील भागांवर आहे जे पुढे सरखेल ज्यामुळे लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या आसपासच्या भागांमध्ये हलका पाऊस आणि बर्फ़बवृष्टीची शक्यता आहे. दुसरीकडे, देशाच्या उत्तर पश्चिम भागांवर कोरडे वारे वाहतील. त्यामुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

शेवटी, मध्य भारतात हवामान कोरडे राहील. रात्रीच्या तापमानात किंचित घट दिसून येईल. दिवस स्वच्छ आकाशासह थोडा उबदार राहील. मुंबईतही हवामान कोरडे व उबदार राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES