हवामान अंदाज 30 जानेवारी: उत्तर महाराष्ट्रात तापमान कमी होणार

January 29, 2020 8:22 PM | Skymet Weather Team

उत्तर भारतापासून सुरुवात करूया, आता पश्चिमी विक्षोभ दूर जात आहे. कोरड्या हवामानाची उत्तर भारतात शक्यता आहे. थंड वारा पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये वाहील ज्यामुळे किमान तापमानात घट होईल. सकाळच्या वेळेस मध्यम धुके येण्याची शक्यता.

पूर्व भारतात एक ट्रफ पश्चिम बंगाल ते ओडिशा पर्यंत विस्तारित आहे. म्हणूनच, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीवर ३० जानेवारी रोजी दुपारपर्यंत विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, आसामच्या पूर्वेकडील भागात चक्रवाती परिस्थिती आहे. तर, आसाम, मेघालय आणि नागालैंड मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशच्या वरच्या भागात एक दोन ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याउलट, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडचे हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

मध्य भारतात, उत्तर दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गुजरात आणि राजस्थानचे किमान तापमान आणखी खाली येईल. त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील किमान तापमानातही काही अंशांनी घट होईल. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान चार ते पाच अंशाने खाली येईल.

शेवटी दक्षिण भारतात, जिथे दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रवाती परिस्थिती आहे. अशा प्रकारे, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये उष्ण वारा कायम राहील. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. संपूर्ण द्वीपकल्पात कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES