हवामान अंदाज 24 जानेवारी: जम्मू आणि काश्मीर मध्ये पाऊस, महाराष्ट्रात हवामान कोरडेच राहणे अपेक्षित

January 23, 2020 7:07 PM | Skymet Weather Team

उत्तर जम्मू काश्मीरवर पश्चिमी विक्षोभ आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या वरच्या भागात एक-दोन ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची अपेक्षा आहे. उत्तराखंडचे हवामान कोरडे राहील. उत्तरेकडील मैदानावर जोरदार उत्तर पश्चिम दिशेने वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे पंजाब, उत्तर राजस्थान आणि दिल्लीच्या किमान तापमानात घट होईल.

पूर्व भारतात, उत्तर पश्चिमी दिशेने थंड वारे वाहतील. धुके कमी झाल्यामुळे दिवसाचे तापमान पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वाढेल. दक्षिण आसाममध्ये चक्रवाती परिस्थिती आहे. अरुणाचल प्रदेशात चांगला पाऊस आणि बर्फवृष्टीची अपेक्षा आहे. नागालैंड, आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी पाऊस पडेल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

मध्य प्रदेश, विदर्भ आणि राजस्थानमधील काही भागांत किमान तापमानात तीन ते चार अंशाने घट झाली आहे. आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की छत्तीसगड तसेच गुजरातमधील काही भागांतही दोन ते तीन अंशाने तापमानात घट होईल. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह देशातील संपूर्ण मध्य भागातील हवामान कोरडे राहील.

शेवटी दक्षिण भारतात, तेलंगाणात चक्रवाती परिस्थिती आहे. संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पात हवामान कोरडे राहील. ईशान्य कोरड्या वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील कर्नाटक आणि केरळमध्ये तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहील. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील भागात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES