हवामान अंदाज 22 जानेवारी: महाराष्ट्रात हवामान कोरडेच, किमान तापमानात वाढ होण्याची शक्यत

January 21, 2020 7:08 PM | Skymet Weather Team

वेस्टर्न डिस्टर्बन्स पूर्वेकडे सरकत आहे परंतु या प्रणालीचे अवशेष पश्चिम हिमालयात 22 जानेवारीच्या दुपारपर्यंत विखुरलेला पाऊस आणि बर्फवृष्टी देतील. उत्तर-पंजाब आणि हरियाणा जिल्ह्यातही एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक भागात मध्यम ते दाट धुक्याची शक्यता आहे.

मध्य भारतात राजस्थान, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात उत्तर पश्चिम वारा सुरू होईल आणि किमान तापमानात घट होईल. परंतु, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील कॉन्फ्लुएन्स झोन पूर्व आणि मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागांमध्ये विखुरलेला पाऊस देईल. महाराष्ट्राचे हवामान कोरडे राहील परंतु किमान तापमानात 1-२ अंशांनी वाढ होईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

२२ जानेवारी रोजी संध्याकाळपर्यंत थंड वारा पूर्वेकडील भागांमध्ये सुरु होईल आणि त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात घट होईल पण बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात पुढील २४ तासांत दाट धुक्याची शक्यता आहे. पूर्व भारताचे हवामान कोरडे राहील परंतु चक्रवाती परिस्थिती पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशात आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश, पूर्व आसाममधील काही भागात विखुरलेला पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. नागालैंडमध्ये हलका पाऊस पडेल. उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या दक्षिण द्वीपकल्पात कोणतीही हवामान प्रणाली नाही आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील बऱ्याच भागांचे हवामान कोरडे राहील. तथापि, तामिळनाडूच्या दक्षिणेकडील भागात आणि केरळमध्ये एक-दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील इतर भाग जवळजवळ कोरडेच राहतील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES