उत्तर पाकिस्तान आणि आसपासच्या भागांत एक पश्चिमी विक्षोभ आहे. चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थानवर आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश कोरडे राहतील. पहाटे या भागात धुके असण्याची शक्यता आहे.
मध्य भारतात हलके वारे वाहत आहेत. उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये सकाळच्या वेळी मध्यम प्रमाणात धुके असण्याची शक्यता आहे. मुंबई मध्ये दुपार किंचित उबदार राहील.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
पूर्व भारतात, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांत उत्तर पश्चिम दिशेने थंड वारे वाहत आहे. मध्यम धुक्याची शक्यता आहे. त्याशिवाय आसामच्या पूर्वेकडील भागात चक्रवाती परिस्थिती आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडेल.उत्तर आसाम, नागालैंड आणि मणिपूर आणि मिझोरममध्ये एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल.
शेवटी दक्षिण भारतात, जिथे बंगालच्या उपसागरापासून वारे वाहत आहे. म्हणूनच, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्यथा तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि तेलंगाणामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com