उत्तर भारतापासून सुरुवात करूया, चक्रवाती परिस्थिती उत्तर प्रदेशवर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पश्चिमी विक्षोभ आहे. तसेच, एक ट्रफ रेषा पाकिस्तानहून बिहारकडे जात आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात एक दोन मुसळधार सरी पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीसह उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि मध्य भागातही येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. दिल्ली एनसीआर तसेच उत्तर पंजाब आणि हरियाणामध्ये तुरळक पाऊस पडेल.
पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात, जेथे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे मध्यम पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाचे हवामान जवळपास कोरडे राहील. तथापि, या भागात किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होऊ शकते. ईशान्य भारताचे हवामानही जवळजवळ कोरडे राहील. तथापि, उत्तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
मध्य भारतात, जेथे उत्तर प्रदेशातील चक्रवाती परिस्थितीपासून पूर्व मध्य प्रदेश पर्यंत एक ट्रफ विस्तारित आहे. म्हणूनच आम्ही पूर्व उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची अपेक्षा करतो. तथापि, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात तसेच दक्षिण राजस्थानचे हवामान जवळजवळ कोरडे राहील. राजस्थानच्या पश्चिम भाग तसेच गुजरातच्या काही भागात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे
शेवटी दक्षिण भारतात, कोणत्याही महत्वपूर्ण गतिविधींची शक्यता नाही आहे. संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पात हवामान कोरडे राहील. किनार्यावरील कर्नाटकात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com