उत्तर भारतात, एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिम हिमालया जवळ पोहोचेल.जम्मू-काश्मीरमध्ये संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याचा आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम मैदानावरील हवामान कोरडे राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानच्या किमान तापमानात किरकोळ वाढ होऊ शकते.
मध्य भारतातील हवामान कोरडे व थंड राहील. उत्तर दिशेने येणाऱ्या वाऱ्यांच्या निरंतर प्रवाहामुळे पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भाचे तापमान खाली येण्याची अपेक्षा आहे. तर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि कोकण आणि गोव्यात तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण भारतात हवामान कोरडे राहील. तेलंगाणाच्या रात्रीच्या तापमानात किरकोळ घसरण होऊ शकते तर तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये तापमानात किरकोळ वाढ होईल. किनारपट्टी आंध्र प्रदेशात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व भारतात,हवामान कोरडे राहील. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या रात्रीच्या तापमानात १ ते २ अंशांनी घट होऊ शकते. ईशान्य भारतामध्ये चक्रवाती परिस्थिती आहे ज्यामुळे पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com