हवामान अंदाज 9 मे: मध्य भारत आणि दिल्ली मध्ये हवामान कोरडे; आंध्र प्रदेश मध्ये पाऊस

May 8, 2019 7:51 PM | Skymet Weather Team

उत्तर भारता, पासून जर आपण सुरुवात केली, तर सध्या एक नवीन पश्चिमी विक्षोभ पाकिस्तानच्या उत्तर भागांवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या मध्य भागांवर आणि लगतच्या पंजाब वर बनलेली आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, पंजाब व हरियाणामधील काही भागात धुळीचा वादळासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याउलट, दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. दिल्ली मध्ये उत्तर पश्चिमी दिशेने कोरडे आणि गरम वारे वाहतील.

पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती पश्चिम बंगालच्या उत्तर भाग, सिक्कीम आणि आसपास बनलेली आहे. बंगालच्या खाडीपासून उष्ण वारे उत्तर पूर्व राज्यांवर वाहत आहे, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या उत्तर भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, असम आणि मेघालय मध्ये हलक्या ते मध्यम विखुलेल्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, संपूर्ण पूर्व भारता मध्ये हवामान कोरडे राहील.

मध्य भारतात, अरब सागरापासून उष्ण वारे येत आहे ज्यामुळे गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या तापमानात घट दिसून येईल. दुसरीकडे, उत्तर राजस्थान आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. मध्य भारतातील भाग जसे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये हवामान कोरडे आणि गरम राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा पश्चिम बंगाल आणि सिक्कीम पासून आंध्र प्रदेश पर्येन्त विस्तारलेली आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारी भाग आणि रायलसीमा मध्ये विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येईल. याउलट, दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये पावसाचा जोर आता कमी होईल आणि या ठिकाणी हलका पाऊस पडत राहील. कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागांवर एक दोन ठिकाणी पाऊस पडेल. तसेच, अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES