उत्तर भरता पासून जर आपण सुरवात केली तर, सध्या एक पश्चिमी विक्षोभ उत्तर अफगानिस्तान वर बनलेला आहे, ज्याच्या प्रभावामुळे एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या मध्य भागांवर बनलेली आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या उलट, उत्तर व उत्तर पश्चिम दिशेने गरम वारे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये वाहत आहे ज्यामुळे या भागांचे हवामान गरम राहील.
मध्य भारतात, हवामान कोरडे राहील. या शिवाय, राजस्थान, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेश मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. गुजरात मध्ये तापमान सामान्यच्या आपसास नोंदवले जातील.
पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती पश्चिम बंगालच्या भागांवर बनलेली आहे. या शिवाय एक ट्रफ रेषा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या आसपास विस्तारलेली आहे, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या उत्तर भाग, सिक्कीम आणि उत्तर पूर्व राज्यांवर हलका ते मध्यम विखुलेल्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, बिहार, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार. परंतु ओडिशाच्या किनारी भागांवर एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण भारतात, एक उत्तर दक्षिण ट्रफ रेषा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या आसपास विस्तारलेली आहे. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती तामिळनाडू वर बनलेली आहे, ज्यामुळे आंतरिक तामिळनाडू, दक्षिण आंतरिक कर्नाटक, चेन्नई मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडू शकतो. केरळ, रायलसीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांवर पावसाची शक्यता आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com