Skymet weather

हवामान अंदाज 7 मे: मध्य आणि उत्तर पश्चिम भारतात उष्णतेची लाट, दक्षिण भारतात पाऊस

May 6, 2019 7:36 PM |

उत्तर भारतात, एक पश्चिमी विलक्षोभ उत्तर अफगानिस्तान आणि त्याच्या आसपास बनलेला आहे. पश्चिम विक्षोभाच्या प्रभावामुळे एक चक्रीवादळ पाकिस्तानच्या मध्य भागांवर बनलेला आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली मध्ये उत्तर पश्चिम दिशेने गरम वारे वाहतील ज्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ दिसून येईल आणि उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

तसेच मध्य भारतावर गरम वारे वाहतील. सध्या बहुतांश भागातील तापमान ४० अंश किंवा त्याच्या वर आहे. विदर्भाच्या काही ठिकाणी उष्णतेची लाट पण सुरु आहे. आमची अशी अपेक्षा आहे कि राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील अजून काही भाग पण उष्णतेची लाट अनुभतील.

पूर्व भारतात, एक चक्रीवादळ अरुणाचल प्रदेश वर बनलेला आहे. एक ट्रफ रेषा पश्चिम बंगाल आणि सिक्कीम च्या उत्तर भागांन पासून दक्षिण भारता पर्येन्त विस्तारलेली आहे ज्यामुळे अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात पाऊस पडण्याची अपेक्षां आहे. पूर्व भारत मात्र कोरडेच राहणार.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा आंतरिक तामिळनाडू पर्येन्त विस्तारलेली आहे ज्यामुळे दक्षिण आंतरिक कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मध्ये पाऊस पडण्याची शक्यात आहे. आंध्र प्रदेशच्या किनारी भागांवर उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. येथे पार ४० अंशाचा वर पोहोचण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try