पूर्व आणि उत्तर पूर्व राज्यात, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पूर्व बिहार आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उत्तर भागांवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा उत्तर ओडिशा पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, उत्तर पूर्व राज्यात, पश्चिम बंगालच्या उत्तर भागात, व सिक्कीम मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. .तसेच, बिहार, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे. अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप द्वीपसमूहांवर पाऊस सुरु राहील.
दक्षिण भारतात,एक चक्रवाती परिस्थिती तेलंगाणा आणि लगतच्या कर्नाटकच्या दक्षिण भागात बनलेली आहे. एक ट्रफ रेषा दक्षिण तामिळनाडू पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि उत्तर पश्चिम तामिळनाडू मध्ये जोरदार पावसाची सुद्धा शक्यता आहे. याउलट, आंध्र प्रदेश, तटीय कर्नाटक, कोंकण व गोआ आणि केरळ मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे.
उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि त्याच्या आसपास बनलेला आहे. प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती राजस्थानच्या पश्चिम भागांवर बनलेली आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थान मध्ये काही ठिकाणी धुळीचा वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट, उत्तर प्रदेश मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
मध्य भारतात, उत्तरपश्चिम दिशेने वारे वाहत आहे, ज्यामुळे हवामान गरम आणि कोरडे राहील. विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. तथापि, छत्तीसगढच्या दक्षिण भागात एक दोन ठिकणी पाऊस पडू शकतो, असे दिसून येत आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com