Skymet weather

हवामान अंदाज 18 मे: काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये पाऊस

May 17, 2019 5:49 PM |

उत्तर भारता पासून जर आपण सुरुवात केली, तर एक नवीन पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती उत्तर राजस्थान आणि लगतच्या हरियाणा मध्ये बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पश्चिम उत्तर प्रदेश पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाचा जोर वाढेल. एक दोन ठिकणी बर्फवृष्टीची पण शक्यता आहे. दुसरीकडे, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस होणे अपेक्षित आहे.

मध्य भारतात, अरब सागरापासून वारे गुजरात, दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही ठिकाणी वाहत आहे, ज्यामुळे या ठिकाणी तापमानात वाढ नाही दिसून येईल. याउलट, दक्षिण छत्तीसगढ मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शकयता आहे. विदर्भ मध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

पूर्व आणि उत्तर पूर्व राज्यात, एक चक्रवाती परिस्थिती असमच्या पूर्व भागांवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा आंतरिक तामिळनाडू पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे असम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर एक दोन ठिकाणी जसे मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे पावसाची अपेक्षा आहे. याउलट, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा तेलंगाणा, आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आसपास विस्तारलेली आहे, ज्यामुळे केरळ, आंतरिक तामिळनाडू आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या किनारी भागात एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मॉन्सूनचे लवकरच आगमन होईल, ज्यामुळे येथे पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try