बगूया पुढील २४ तासात संपूर्ण देशभरात हवामानाची परिस्थिती कशी राहणार उत्तर भारत बदल सांगायचे तर, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती उत्तर राजस्थान आणि लगतच्या पंजाब व हरियाणात बनलेली आहे. ज्यामुळे, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड मध्ये पावसाचा जोर वाढेल. एक दोन ठिकाणी बर्फवृष्टीची पण शक्यता आहे. पंजाब मध्ये काही ठिकाणी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. हरियाणा व राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती पश्चिम बंगालच्या उत्तर भागात आणि सिक्कीमवर बनलेली आहे. याशिवाय, बंगालच्या खाडीतून उष्ण वारे वाहत आहे. एक ट्रफ रेषा पण दक्षिण भारता पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे उत्तर पूर्व भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पूर्व बिहार, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये आकाशढगाळसह हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे.
मध्य भारतात, हवामान कोरडे आणि गरम राहणार. विदर्भ मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. छत्तीसगढ, दक्षिण मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्र मध्ये तापमान सामान्यपेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त राहील.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा तेलंगणा, आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आसपास विस्तारलेली आहे, ज्यामुळे केरळ, आंतरिक तामिळनाडू आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, तेलंगलाणा आणि उत्तर आंतरिक कर्नाटक मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार.
Any information taken from here should be credited to skymetweather.com