हवामान अंदाज 15 मे: आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये पावसाची शक्यता, गुजरात मध्ये हवामान मात्र कोरडेच

May 14, 2019 7:35 PM | Skymet Weather Team

उत्तर भारता पासून जर आपण सुरुवात केली तर, एक नवीन पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड मध्ये आधी बनलेला पश्चिमी विक्षोभामुळे काही ठिकाणी पाऊस सुरु राहील. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मध्ये काही ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. खरं तर, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेश मध्ये पूर्व मॉन्सूनचा पाऊस सुरु राहील.

दक्षिण पश्चिम दिशेने उष्ण वारे गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये वाहत आहे, ज्यामुळे दक्षिण पूर्व राजस्थान आणि उत्तर पूर्व मध्य प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर छत्तीसगढ मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती बिहारच्या पूर्व भागांवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा दक्षिण भारता पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे सिक्कीम आणि उत्तर पूर्व राज्यात पावसाची शक्यता आहे. गंगीय पश्चिम बंगाल आणि पूर्व बिहार मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, ओडिशा आणि झारखंड मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे,

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तामिळनाडूच्या आसपास विस्तारलेली आहे ज्यामुळे, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये पावसाचा जोर थोडा जास्त राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES