हवामान अंदाज 11 मे: पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये धुळीचा वादळासह पाऊस, मुंबई मध्ये हवामान मात्र कोरडेच

May 10, 2019 7:46 PM | Skymet Weather Team

उत्तर भरता पासून जर आपण सुरुवात केली तर, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवर्ती परिस्थिती मध्य पाकिस्तान व लगतच्या उत्तर पश्चिम राजस्थानवर बनलेली आहे. ज्यामुळे, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यात आहे. दुसरीकडे, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शकयता आहे. येथे तापमानात पण घट दिसून येईल.

मध्य भारतात, अरब सागरापासून उष्ण वारे दक्षिण राजस्थान आणि गुजरात मध्ये वाहत आहे, ज्यामुळे या भागांच्या तापमानात घट दिसून येईल. याशिवाय, दक्षिण पूर्व राजस्थान आणि लगतच्या पश्चिम मध्य प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती असम आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. एक ट्रफ रेषा झारखंड पासून आंतरिक कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, पश्चिम बंगालच्या उत्तर भाग व सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, असम आणि मेघालय मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यात आहे. दुसरीकडे, मणिपुर, मिझोराम आणि त्रिपुरा मध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. याउलट, झारखंड आणि आंतरिक ओडिशा मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यात आहे. परंतु, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये हवामान मात्र कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि दक्षिण आंतरिक कर्नाटकच्या जवळपास विस्तारलेली आहे ज्यामुळे, उत्तर आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि रायलसीमा मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू च्या किनारी भागांवर हवामान मात्र कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES