Skymet weather

हवामान अंदाज 10 मे: राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये धुळीचा वादळासह पाऊस

May 9, 2019 6:40 PM |


उत्तर भारतात, एक नवीन पश्चिमी विक्षोभ पाकिस्तानच्या उत्तर भाग व लगतच्या जम्मू काश्मीर वर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या मध्य भाग व लगतच्या उत्तर पश्चिम राजस्थान वर बनलेली आहे. या शिवाय, अरबसागरापासूम उष्ण वारे उत्तर पश्चिम भागांवर वाहत आहे. ज्यामुळे, जम्मू काश्मीरच्या बऱ्याच ठिकाणी व हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही ठिकाणी पावसाची शक्यात आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये धुळीचा वादळासह पावसाची शक्यात आहे.

दक्षिण राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांवर वर उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे, याह भागातील कमाल तापमानात १ ते २ अंशानी घट दिसून येईल. परंतु, विदर्भ आणि छत्तीसगढच्या काही भागात उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती असम आणि मेघालय वर बनलेली आहे. याशिवाय बंगालच्या खाडी पासून उष्ण वारे उत्तर पूर्व राज्यांवर वाहत आहे. एक ट्रफ रेषा पूर्व बिहार पासून दक्षिण भारत पर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे, असम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालचे उत्तर भाग, सिक्कीम आणि उत्तर पूर्व राज्यांवर विखुलेल्या पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, पूर्व भारता मध्ये हवामान कोरडे राहील व पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंड मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

दक्षिण भारतात, केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये विखुलेल्या पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या किनारी भागांवर एक दोन ठिकाणी पाऊस पडेल. दुसरीकडे तेलंगाणा मध्ये हवामान कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try