एक चक्रवाती परिस्थिती लक्षद्वीपवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पूर्व उत्तर प्रदेश पासून केरळ पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटक मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येथे लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार आहे.
एक चक्रवाती परिस्थिती बांगलादेश आणि आसपास बनलेली आहे. याशिवाय, बंगालच्या खाडीपासून उष्ण वारे उत्तर पूर्व राज्यांवर वाहत आहे ज्यामुळे त्रिपुरा, मेघालय आणि पश्चिम असम मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, झारखंड मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये हवामान कोरडे राहील.
दक्षिण कोंकण व गोआ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. याशिवाय, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडणे अपेक्षित आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर मध्ये येणाऱ्या २४ तासात, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसामुळे, तापमानात २ ते ३ अंशांनी घट दिसून येईल ज्यामुळे हवामान आनंदायी होईल. याउलट, विदर्भात, मुख्यतः नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी व लगतच्या उत्तर मराठवाड्यात उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. कारण आहे, उत्तर व उत्तर पश्चिम दिशेने येणारे गरम आणि कोरडे वारे. तथापि, विदर्भाच्या आसपास होणाऱ्या पावसामुळे, विदर्भ क्षेत्र देखील येणाऱ्या २४ तासात हलका पाऊस अनुभवतील. परंतु येथे रहिवाशांना उष्णतेच्या लाटांपासून तूर्तास सुटका मिळणार नाही, असे दिसून येत आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
पावसाचा जोर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये कमी होईल. तथापि एक दोन ठिकाणी पाऊस पडत राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान मध्ये हवामान कोरडे होईल. उत्तर राजस्थान मध्ये तीव्र उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.
Any information taken from here should be credited to skymetweather.com